खडसेंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न : या पदावर मिळणार संधी - BJP may give opportunity to khadase in Party organisation at national level | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न : या पदावर मिळणार संधी

तुषार रुपनवर
गुरुवार, 21 मे 2020

खडसे यांना आमदार, राज्यपाल व्हायचे आहे. संघटनेतील पदाने ते खूष होणार का?

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना पक्ष लवकरच नवी संधी देणार आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टिममध्ये त्यांना स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नड्डा हे जूनमध्ये नव्या टिमची घोषणा करणार आहेत. यात महाराष्ट्रातून हंसराज अहिर आणि एकनाथ खडसे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. हंसराज अहिर यांनी यापूर्वी केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच विधानपरीषद तिकिट नाकारल्यामुळे सध्या ते पक्षावर नाराज असल्याच थेट उघडपणे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष एकनाथ खडसे यांची दखल घेऊन त्यांना केंद्रातील टिममध्ये स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारलेले किंवा पराभूत झालेले नेते आपल्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते. त्यांना विधान परिषदेर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्याऐवजी भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यातून हे नेते सध्या नाराज आहेत. खडसे यांनी तर थेट पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी खडसेंच्या टिकेला उत्तर दिले. त्यातून खडसे विरुद्ध पाटील असा सामना रंगला.

आता भाजप नेते या नाराजांचा विचार करण्यास तयार झाले आहे. पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंकजा मुंडेंवर मुलीसारखे प्रेम आहे, असे सांगत या नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. खडसे यांना राजकीय पद हवे होते. त्याऐवजी त्यांना संघटनेत स्थान देण्याचा पक्षाचा विचार दिसतो आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख