महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची या भाजप नेत्याची मागणी

ठाकरे सरकारविरोधात भाजपनेआता आक्रमक धोरण ठेवले आहे.
subramaniam swami
subramaniam swami

पुणे : महाराष्ट्रातील कोरोना संकटावरून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाआघाडी सरकारविरोधात आता थेट पवित्रा घेतला आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी काल राज्यपालांना भेटून, स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदने देऊन सरकारच्या विरोधात रान तापविण्यास सुरवात केली आहे.

भाजप आता केवळ यावर थांबलेला नसून पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच वेळ असून नाहीतर ती निघून गेलेली असेल. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली. आता राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष केवळ स्टेज शो द्वारे तुम्हाला संपवतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. त्यातील त्यातील तीस टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशाच्या कोरोना रुग्णांच्या वीस टक्के एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला परिस्थिती नीट हाताळता आलेली नाही. असा दावा एका  लेखात करण्यात आला आहे. त्या लेखाचे स्वामी यांनी समर्थन केले असून राष्ट्रपती राजवटीसाठी ते सयुक्तिक कारण असल्याचे म्हटले आहे. 

या लेखात म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही महासाथ असल्याचे जाहीर करण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 9 मार्च रोजी महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.  संयुक्त अरब अमिरातीतून आलेले हे जोडपे बाधित सापडले होते. संयुक्त अमिरातीतून येणाऱ्या प्रवाशांमध्येच सुरवातीच्या काही केसेस सापडल्या. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज 42 हजार प्रवासी येतात. कोरोनाबाधित देशांतून आलेल्या रुग्णांचे तपासणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्य़ंतही महाराष्ट्राने सुरू केलेली नव्हती, असा दावा या लेखात करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कडे लक्ष दिले नाही. केंद्र सरकारनेच विमानसेवा बंद करेपर्यंत ते हातावर हात धरून होते, असा आरोप करण्यात आला आहे. दुसरा ठपका गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाॅकडाऊनची अंमलबजावणी धारावी आणि गोवंडी साऱख्या भागात व्यवस्थितरित्या झाली नाही. तसेच कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातून परत जात असलेल्या मजूरांसाठी काही केले नाही. मुंबईतील अनेक आस्थापना या मजुरांवरती अवलंबून आहेत. लाॅकडाऊन संपल्यानंतर सूट दिली तरी मजुरांअभावी मुंबईतील अनेक कामे ठप्प होणार आहे. पुरेसे पीपीई किट व साहित्य देण्यात अन्न व औषधमंत्री राजेंद्र शिंगणे हे अपयशी ठरल्याचे यात म्हटले आहे. या साऱ्या मतांना स्वामींनी पाठिंबा देत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com