शिवसेनेचा रंग आता हिरवा झाला का...सोमय्यांचा सवाल 

नामांतरावरुन महाविकास आघाडीत असलेल्या मदभेदावरुन शिवसेनेचा रंग आता हिरवा झाला आहे का, असा थेट सवाल किरिट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
ks4.png
ks4.png

मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपाने नामांतराच्या मुद्यावर शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडीत असलेल्या मदभेदावरुन शिवसेनेचा रंग आता हिरवा झाला आहे का, असा थेट सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टि्वटरवर विचारला आहे. 

औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचे सांगतले होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची सुरुवात केली आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी याच मुद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

किरिट सोमय्या व्हिडिओद्वारे म्हणाले की, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूह्दयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. 

काँग्रेसची भूमिका काय 
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे. पण नामंतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले आहे. आमच्यासाठी संत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.

हेही वाचा : औरंगाबाद नामांतराबाबत अजित पवार म्हणाले...  
मुंबई : काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. औरंगाबादच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, ''महाविकास आघाडीतील तीनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरिता एकत्र आलेले आहेत. यासाठी आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही सामोपचाराने मार्ग काढू.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com