पंकजा मुंडेंनी केले पवारांच्या कार्यशैलीला सलाम.. म्हणाल्या, "“शरद पवार साहेब, hats off…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचे कैातुक केलं आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी टि्वट केलं आहे.
3Pankaja_20Munde_20_20Sharad_20Pawar.jpg
3Pankaja_20Munde_20_20Sharad_20Pawar.jpg

मुंबई :  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचे कैातुक केलं आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी टि्वट केलं आहे. शरद पवार यांच्या कामाबाबात पंकजा मुंडे यांनी प्रशंसा केली आहे. कोरोना, राज्यातील अतिवृष्टी या काळातील शरद पवार यांचे दैारे, बैठका सुरू आहे. पवार यांच्या या कामाला मुंडे यांनी सलाम केला आहे.  

पंकजा मुंडे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की “शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” 

राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात काल  (२७ ऑक्टोबर)  शरद पवारांच्या उपस्थितीत  पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कार्यशैलीबाबत ट्विट केलं आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.  पंकजा मुंडे दुसऱ्या टि्वटमध्ये म्हणतात की आमचा पक्ष आणि विचारधारा वेगळ्या आहेत. पण कठोर परिश्रम आणि मेहनत करणाऱ्या विषयी आदर केला पाहिजे, ही शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला दिली आहे.

ऊसतोड मजुरांच्या मजुरीत किती वाढ व्हावी, असा कुठलाच आकडा मी जाहीर केला नव्हता. साखर महासंघाकडून आज जी सरासरी 14 टक्‍क्‍यांची वाढ मिळाली आहे, त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी पुण्यात बोलताना सांगितले. ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीला सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज दिली. दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही वाढ कमी असल्याचे सांगत फेब्रुवारीत पुन्हा संप करण्याचा इशारा दिला आहे. 
 
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com