पंकजाताई, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच...धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट - bjp leader pankaja munde corona positive ncp leader dhananjay munde prayed for health recover | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजाताई, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच...धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

 "लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,"  

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.  पंकजा यांचे बंधु समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत पंकजा यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  "लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई," अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. 

''माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून आधिपासूनच विलगिकरणात आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. व काळजी घ्या, असे टि्वट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणतात...पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.

हेही वाचा : खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण 
 
खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना आज रात्री मुंबई येथील लिलावती हाँस्पीटल मध्ये हलविण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी गुरुवारी २२ रोजी ट्विट करून दिली होती. त्यानंतर  त्यांना पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले . येथे तज्ज्ञ डॉक्टरा मार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबईच्या लिलावती हाँस्पीटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.  मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईला उपचारासाठी आज रात्री नेण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख