राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही....   - BJP leader Nitesh Rane criticizes Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही....  

अनंत पाताडे  
सोमवार, 18 जानेवारी 2021

आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक निवडणुकीत देखील आमचीच सत्ता येणार, असे नितेश राणे यांनी सांगितले.  

सिंधुदुर्ग : "सिंधुदुर्गात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही  आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व पाहता येथील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे हेही दाखवून दिले आहेत. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक यात देखील सत्ता देखील आमचीच असणार आहेत आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्यादगडावरची रेघ आहे," असे व्यक्तव्य करत भाजपचे नेते नितेश राणेंनी ग्रामपंचायत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिल्या आहेत

धुळे तालुक्यात काँग्रेससह महा विकास आघाडीचे वर्चस्व

धुळे तालुक्यामध्ये तब्बल 90 टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. धुळे तालुक्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु निकालाअंती धुळे तालुक्यामध्ये भाजपला दणका देत काँग्रेस पक्षासह महा विकास आघाडीने आपलं वर्चस्व कायम ठेवल आहे. 
काँग्रेसच्या विचारांनाच मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान कौल दिला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. हुल्लड कार्यकर्त्यांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना आपला खाक्या दाखवत हुल्लड बाजांना काठ्यांचा प्रसाद द्यावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतमोजणी पार पडत असताना धुळे शहरातील क्यूमाईन क्लब परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी आरडाओरड करत एकच गोंधळ केला. पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी आपला खाक्या दाखवत काठीचा प्रसाद कार्यकर्त्यांना देत जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केला. 

बुलढाणा : (सातगाव म्हसला) सातगाव म्हसला येथील 9 पैकी 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत तर 3 जण काँग्रेसचे आहेत, जे विजयी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपला येथे एकही सीट जिंकता आली नाही.

हेही वाचा : पुतण्याचा पराभव विजयसिंह मोहिते पाटलांच्या जिव्हारी
 पंढरपूर : अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना धक्का बसला आहे. त्यांचे पुतणे संग्राम सिंह मोहिते-पाटील यांना गिरीराज माने-पाटील यांनी पराभूत केले आहे. जनसेवा संघटनेचे डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे दोन उमेदवार या वादातून झालेल्या 17 पैकी तीन उमेदवार डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांची विजयी

आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विजयसिंह मोहिते पाटील विरूध्द पुतणे डॅा. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटात मोठ्या चुरसीने निवडणूक झाली आहे. अकलूज ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विजयसिंह मोहिते पाटील गटाची एक हाती  सत्ता आहे. त्यांच्या सत्तेला त्यांचे पुतणे धवलसिंह यांनी आवाहन दिले होते. 

येथील 17 जागा पैकी एक जागेवर धवलसिंह यांच्या पत्नी उर्वशीराजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 16 जागांसाठी चुरसीने मतदान झाले. मतदाना दरम्यान दोन गटात बाचाबाचीचे प्रकार देखील झाले आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख