निलेश राणे म्हणतात..."यांना लाथेनं मारलं पाहिजे..." - bjp leader Nilesh Rane target mla Pratap Sarnaik | Politics Marathi News - Sarkarnama

निलेश राणे म्हणतात..."यांना लाथेनं मारलं पाहिजे..."

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 डिसेंबर 2020

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) २४ नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता. ईडीने आमच्यावर छापे का टाकले हे मलाच माहीत नाही, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबरला सक्तवसुली संचनालयाने (ईडी) सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक केली. कारवाईनंतर सरनाईक क्वारंटाईन झाले होते. त्यानंतर ते ईडी समोर उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, या कारवाईच्या विरोधात सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.गेल्या आठवड्यात प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. 

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी टि्वट करून सरनाईक यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे. तानाजी मालुसरेंच्या नखाचीही सर नसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले प्रताप सरनाईक आता महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची बदनामी करत आहेत. तुलना करणं तर सोडून द्या पण एकही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं."

संबंधित लेख