निलेश राणेंनी विनायक राऊतांना पुन्हा डिवचले

शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यावर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे निशाणा साधला आहे.
nr20f.jpg
nr20f.jpg

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात शिवसेना खासदार विनायक राऊत आणि भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी एकमेकांचे पुतळे जाळले होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनंतर वातावरण निवळत असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्यावर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे निशाणा साधला आहे. 

निलेश राणे म्हणाले की शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राऊतांचा दहा वेळा पुतळा जाळला. तेवढी अवकात विनायक राऊत यांची सुध्दा आणि शिवसेनेची सुद्धा नाही. मी रोज याचा वचपा काढणार 2024 खूप लांब आहे.

ग्रामपंचायतीचा निवडणुकीत शिवसेनाला आडवच केलं 70 पैकी 45 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच बसले. आतापासूनच 2024 पर्यत शिवसेना कुठेच ठेवायची नाही हे आम्ही ठरवलं आहे. कारण महाराष्ट्राच नुकसान आहे. फार मोठी ताकद नाही फक्त 56 आमदार आहे ते घालवायला किती वेळ लागतोय. त्यावेळी भाजप बरोबर होती म्हणून 56 आमदार निवडून आले, असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.  

हेही वाचा : रायगड उजळविणाऱ्या खात्यावर छत्रपती संभाजीराजे का डाफरले?
 
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच रायगडावरील रोषणाईचा वाद पुढे आला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या रोषणाईला आक्षेप घेतल्याने नक्की काय घडले, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील रोषणाई गेले काही वर्षे बंद होती. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकताच रायगडाचा दौरा केला होता. त्यांनी त्या दौऱ्यात पुरातत्व विभागाला रोषणाई सुरू करण्यासाठी आग्रह धरला व स्वनिधीतून त्यासाठी पैसे देण्याची तयारी दाखवली. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार ही रोषणाई केली.

यावरून चिडलेल्या संभाजीराजेंनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. ``भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.`` ते एवढयावरच थांबले नाही तर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, अशी कठोर टिकाही त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com