ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय.. राणेंचा हल्लाबोल - bjp leader nilesh rane attack on shiv sena Ayodhya Ram Mandir | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय.. राणेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

लाज सोडली शिवसेनेने...शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला.

मुंबई : अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा प्रश्न आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. 

राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

यावर भाजचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "लाज सोडली शिवसेनेने...शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा."

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे.  निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे, अशी टीका आजच्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपवर करण्यात आली आहे. 

अयोध्येत राममंदिरच व्हावे, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देणारे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर तत्काळ राज्यसभेचे खासदार झाले. रंजन गोगोई यांनी त्यांच्या अखेरच्या काळात वेगवान पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी घेतली व राममंदिराबाबत सकारात्मक निर्णय घेतला. न्यायालयाचा निर्णय होताच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजनही झाले. मंदिराचे काम वेगाने सुरू झाले आहे. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तंबूत विराजमान झालेले रामलल्ला मंदिरात विराजमान होतील. आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे असं अग्रलेखात म्हटलं आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख