लोकांना मातोश्री वरून सचिन वाझेची गाडी पाठवणार का? - Bjp Leader Narayan Rane criticise CM Udhhav Thakarey over restrictions | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

लोकांना मातोश्री वरून सचिन वाझेची गाडी पाठवणार का?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

नागरिकांकडून नियम पाळले जात नसतील तर अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे धुळफेक असल्याची टीका केली जात आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांचा संदर्भ देत राणे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्र्यांनी अघोषित संचारबंदी सुरू केली आहे. त्यामुळे व्यापार संपणार आहे. लघुउद्योग संपतील. कामगार उध्वस्त होतील. मुंबईत भिकाऱ्यांची संख्या सव्वा लाख आहे. त्यांच्या उपजिविकेच काय करणार ? १५०० हजार च्या पॅकेज मध्ये रिक्षा चालक कसे उपजिविका चालवतील?, असे राणे यांनी नमुद केले.

नागरिकांकडून नियम पाळले जात नसतील तर अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यावरून बोलताना राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. "पेट्रोल पंप बंद केले तर इमर्जन्सीला लोकांना काय मातोश्रीवरून सचिन वाझेची गाडी पाठवणार का," असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 

महाराष्ट्रात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना हातळण्यास कमी पडलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. राज्यात जवळपास ६० हजार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. देशातील ४१ टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात आहेत. मृतांची संख्या वाढणे हे राज्य सरकारच अपयश आहे, असेही राणे यांनी नमुद केले. 

दरम्यान, राणे यांनी अनिल परब यांना एनआयए उचलून नेईल, असेही वक्तव्य पत्रकार परिषदेत केलं आहे. अनिल देशमुख यांनी चौकशीत परब यांचेही नाव घेतलं आहे. त्यामुळे परब यांच्या चौकशीसाठी केवळ राज्यपालांची परवानगी घ्यावी लागेल. ते आले नाहीत तर एनआयए त्यांना उचलून नेईल, असे राणे म्हणाले. 

Edi

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख