बंगालच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला...

बंगालमध्ये तृणमूलला 292 पैकी 213 जागांवर विजय मिळाला आहे. तर 200 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 77 जागांवर समाधान मानावे लागले.
Bjp leader meet governor jagdeep dhankhar over violence in bengal
Bjp leader meet governor jagdeep dhankhar over violence in bengal

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चमत्कार घडवला आहे. तर भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. या निकालानंतर भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले. त्यावरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

बंगालमध्ये तृणमूलला 292 पैकी 213 जागांवर विजय मिळाला आहे. तर 200 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या भाजपला केवळ 77 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस व डाव्या पक्षांना एकही जागा मिळाली नाही. त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पक्षाला एक जागा तर अपक्षाला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेस व डाव्यांचा एकही सदस्य बंगालच्या विधानसभेत नसेल.

राज्यात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याने विरोधी बाकांवर बसावे लागेल. त्याची सुरूवात पक्षाकडून आजच करण्यात आली. निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेतली. 

निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. मागील 24 तासांत त्यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात भीतीचे वातावरण आहे. सत्ताधारी पक्ष हात बांधून बघत आहे तर पोलीसही निष्क्रीय आहेत. याबाबत आम्ही राज्यपालांना निवेदन दिले आहे. त्यांनी यावर आम्हाला आश्वासन दिल्याची माहिती घोष यांनी दिली.

दरम्यान, राज्यपाल धनकर यांनी आज बंगाल पोलीस महासंचालक व कोरकाताच्या पोलीस आुयक्तांनाही भेटीसाठी बोलावले होते. निवडणुकीनंतर राज्यात होत असलेल्या हिंसाचार, लुटालुट, हत्येच्या घटना घडत आहेत. त्यावर तातडीने कारवाई करून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारावी, अशा सुचना राज्यपालांनी त्यांना दिल्या आहेत. 

ममतादीदी घेणार पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेसने घवघवीत यश मिळाल्याने त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. येत्या पाच तारखेला त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज त्यांनी राज्यपाल धनकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला. पण त्याआधीच भाजपचे शिष्यमंडळ राज्यपालांना भेटले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com