मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का..

चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-24T084959.530.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-24T084959.530.jpg

मुंबई : कोकणासह मुंबई, मध्यमहाराष्ट्राला पावसाने दोन दिवसापासून झोडपले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास दैारा केलेला नाही. यावरुन भाजपचे नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. BJP leader Chitra Wagh criticizes Chief Minister Uddhav Thackeray

आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित पंढरपुरला गेले होते. पण अपघातग्रस्तांकडे मुख्यमंत्र्यांना यायला वेळ नाही, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टिका होत आहे. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. 

चित्रा वाघ आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का..खरी गरज आता आहे 
तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय.. 

हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल गेला वाहून
 
चिपळूण : वाशिष्ठी नदी आलेल्या पुरामुळे बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाचा शंभर मीटरचा भाग वाहून गेला. हा प्रकार शुक्रवारी (ता. २३ जुलै) पहाटेच्या सुमारास घडला. पुरामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यातच पुलाचा भाग वाहून गेल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प असून गाड्या पर्यायी मार्गाने आणल्या जात आहेत.  गेले दोन दिवस वाशिष्ठी पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल ब्रिटिशकालीन असल्यामुळे तो कमकुवत झालेला होता. चौपदरीकरणांतर्गत नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला; परंतु आज पहाटेच्या सुमाराला पुलाचा काही भाग वाहून गेला होता. पुलाला भगदाड पडले आहे. तत्पूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाला धोकादायक जाहीर केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com