पंचवीस वर्ष अध्यक्षपद..ही घराणेशाही नाही का ?  - BJP leader Atul Bhatkhalkar has targeted Congress leader Rahul Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

पंचवीस वर्ष अध्यक्षपद..ही घराणेशाही नाही का ? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

राहुल गांधी यांच्या  विधानाला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी व त्यांच्या कुंटुबावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. यावर 'माझ्या घरातील व्यक्ती ३५ वर्षांपूर्वी पंतप्रधान होती, त्यानंतर कोणीही या पदावर बसले नाही ' मग घराणेशाही कुठे आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.  

राहुल गांधी यांच्या या विधानाला अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे. याबाबत भातखळकर यांनी टि्वट केलं आहे. यात ते म्हणतात की गेल्या २५ वर्षात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर तुमची आई आणि तुम्ही सोडून कोणीही बसलेला नाही ही घराणेशाही नाही का?

राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीनच्या विषयावरून निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी हे चीनला घाबरतात. ते चीनसमोर झुकले आहेत, अशी टीका केली होती. यावर अतुल भातखळकर यांना टि्वट करीत म्हटलं आहे की डरपोक तुमचे पणजो नेहरू होते. ज्यांनी हजारो चौरस मैलाचा भारताचा अक्साई भूभाग चीनला आंदण दिला. UPA च्या काळात याची पुनरावृत्ती झाली. अक्कल गहाण ठेवलेला किंवा कोकेनसारखी नशा करणारा माणूसच मोदीजींना डरपोक बोलू शकतो 

हेही वाचा : अजित डोवाल यांच्या जीवाला धोका  

नवी दिल्ली : उरी आणि बालाकोट दोन्ही स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ठार मारण्याचे षडयंत्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने त्यांना मारण्याची कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे. 

अजित डोवाल यांचे कार्यालय सरदार पटेल भवनमध्ये आहे. या कार्यालयाची टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशी करण्यात आली, यातून सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. अजित डोवल यांच्या कार्यालयाचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे आढळले होते. त्यांना ठार करण्याचे षडयंत्र राचल्याचे उघड झाले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख