सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक..शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल...  - bjp leader ashish shelar angry slams in comedy way to uddhav thackeray Magnetic Maharastra | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक..शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार ? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ या उपक्रमांतर्गत ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितलं आहे. यावरून भाजपचे नेते  आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

आशिष शेलार यांची याबाबत टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये शेलार म्हणतात की 2,50,000 नवे रोजगार, 61 हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग? आधी हे सांगा...आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार ? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार ? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?

दुसऱ्या टि्वटमध्ये आशिष शेलार म्हणतात, "निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्दवस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योध्दे यांना मानधन कधी मिळणार? 
शाळांची फि कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार? सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक? ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागातर्फे २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून अडीच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले आहे. कोरनाच्या काळात राज्याच्या उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल, असा क्षण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख