जयंत पाटील-फडणवीस एकाच गाडीत : चर्चेला उधाण

आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत.
जयंत पाटील-फडणवीस एकाच गाडीत : चर्चेला उधाण
2jayant_20patil_fadnaivs.jpg

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांनी काल एका भाषणाची सुरुवातच भाजपला एका मंत्र्याला ऑफर देत केली मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी” भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी 'एकत्रित आले तर भावी सहकारी' असा उल्लेख केला. तर आज  नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच गाडीतून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

औरंगाबादमध्ये (Aurangabad) कालच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्यामुळे अनेक चर्चा रंगल्या असताना आज फडणवीस-पाटील एकाच गाडीतून आल्याने पुन्हा एकदा तर्कवर्तक लढविले जात आहेत.   महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या एकाच गाडीतून आले.

CID : परमबीर सिंह नक्की आहेत तरी कुठे?
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी .के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्धाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा साद घातल्याचे दिसून आले.  भाषणात सुरूवातीलाच "व्यासपीठावार उपस्थित असलेले आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,'' असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टाळी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी देखील केली. मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपला पुन्हा एकदा एकत्रित येण्याचे आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.