"नागपुरातच बसा," असा सल्ला देणाऱ्या आंबेडकरांना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर... - bjp devendra fadanvis on vanchit bahujan aghadi prakash ambedkar advice | Politics Marathi News - Sarkarnama

"नागपुरातच बसा," असा सल्ला देणाऱ्या आंबेडकरांना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे.

कोपरगाव : वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला होता. त्याला फडणवीसांनी आज उत्तर दिलं होते. फडणवीस म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे.  त्यांना हे माहिती नसावं. मी आधीच हे सुरु केलं आहे. नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते केलं आहे. ” bjp devendra fadanvis on vanchit bahujan aghadi prakash ambedkar advice

"पत्र लिहण्याच्या भानगडी करीत राज्यभर वणवण फिरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातच बसावे. तेथे एक-दोन कोविड सेंटर सुरू करुन नागपुरकरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी," असा सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना काल दिला होता. 

दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारू नका..राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा..

कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठच्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. फडणील म्हणाले, "नागपुरला ऑक्सिजनची गरज होती, तोदेखील आणला आहे. वेगवेगळ्या रुग्णवाहिका तसेच सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना माहिती नसावं, त्यामुळे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू"
 
कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य सरकारला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीसांवर टीका केली होती.
 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपातकाली समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपतकालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला. कोविडची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने राज्य सरकार अपयशी ठरल्यात असल्याने ते बरखास्त का करण्यात येऊ नये, या प्रश्नावर बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले.  
 Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख