चित्रा वाघांनी उडवली रुपाली चाकणकरांची खिल्ली...म्हणाल्या..अटक मटक चवळी चटक - bjp chitra wagh reaction ncp rupali chakankar statement devendra fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

चित्रा वाघांनी उडवली रुपाली चाकणकरांची खिल्ली...म्हणाल्या..अटक मटक चवळी चटक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

चित्रा वाघ यांनी टि्वट करीत रुपाली चाकणकर यांच्या मागणीचा समाचार घेतला आहे. 

मुंबई : रेमडिसिवर इंजेक्शनवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप नेते यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केल्या गेलेल्या कारवाईवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  संताप व्यक्त केला होता. 

 
राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी फडणवीस यांनी अटक करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करीत चाकणकर यांच्या मागणीचा समाचार घेतला आहे. 

''उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? #Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे...'' असे टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजप आमदार प्रसाद लाड हे पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब विचारला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांवर कारवाईचा इशारा दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून कारवाईचा इशारा वळसे पाटलांनी दिला होता.  याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

फडणवीस म्हणाले, ''वळसे पाटील म्हणतात, कारवाई करू, मी वीस वर्ष राजकारणात आहे. जनतेसाठी ३६ केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे अशा कारवाईला मी घाबरत नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी मी हे करतच राहणार. कालची घटना फार दुदैवी आहे. हे रेमडिसीवर आम्ही भाजपकरीता मागितले नव्हते. ते आम्ही महापालिकेकडे देण्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. आता सरकार बातम्या परविण्याचे काम करत आहे. सरकाचं हे रचलेलं कुंभाड होते, ते बाहेर पडलं आहे. '' 
Edited by: Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख