अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे?

चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांच्याविधानाची खिल्ली उडवली आहे.
11Ajit_20Pawar_20_20Chandrakant_20Patil_1.jpg
11Ajit_20Pawar_20_20Chandrakant_20Patil_1.jpg

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. परंतू पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना (इलेक्टीव्ह मेरीट) आणि आपले कार्यकर्ते तथा संभाव्य उमेदवारापेक्षा ताकदवान असणाऱ्यांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजितदादांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.  

चंद्रकांत पाटील म्हणाले, कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा काही होणार नाही. तसंच लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही मोदींवर प्रेम आहे. त्यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा. तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे,' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंजाबमध्ये काय झालंय पाहा. जहाज बुडतं तेव्हा सर्वात शेवटी कॅप्टनने बाहेर पडायचं असतं. आता पंजाबमध्ये कॅप्टनने राजीनामा दिलाय, जहाज बुडालं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ''जीएसटीवरून पवारांचा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवाय. त्याच्यावर राज्य चालवायचं आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत,'' असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

'मला माजी मंत्री म्हणू नका,' चंद्रकांतदादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले,...
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी एका कार्यक्रमात ''मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या दोन दिवसांत काय होईल, ते तुम्हाला दिसेल,’ असे विधान नुकतेच केले होते. ते देहु येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे विधान केलं होते. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यावर पाटलांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com