दिग्विजय सिंह म्हणाले, "काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटविणार"..भाजपचा हल्लाबोल.. - bjp attacked on digvijay singh statement on article 370 in kashmir | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

दिग्विजय सिंह म्हणाले, "काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटविणार"..भाजपचा हल्लाबोल..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 जून 2021

टूलकिटप्रमाणेच नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कॅाग्रेसचे नेते दिग्विजय सिंह त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. कलम ३७० बाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेले हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह भाजपकडून कॅाग्रेसवर टीका होत आहे. आता या मुद्द्यावरून टूलकिटप्रमाणेच नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. bjp attacked on digvijay singh statement on article 370 in kashmir

क्लबहाऊस या अॅपमधील लाईव्ह चर्चेमध्ये एका पाकिस्तानी पत्रकारांसोबत दिग्विजय सिंह यांनी हे विधान केलं आहे. या चर्चेत  शाहजेब गिलानी नावाच्या जर्मनीमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकारासोबत ते चर्चा करत होते. यावेळी कलम ३७० च्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा नक्कीच पुनर्विचार करू, असे वादग्रस्त विधान दिग्विजय सिंह यांनी केल्याने ते वादात सापडले आहेत.  

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी क्लबहाऊस मधली ही ऑडिओ क्लिपवर टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिग्विजय सिंह यांच्या क्लबहाऊसबद्दल काय मत आहे? हीच काँग्रेसचीही भूमिका आहे? आम्ही मागणी करतो की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण द्यावे, असे संबित पात्रा म्हणाले. तर भाजपचे कर्नाटकमधील आमदार गिरीराज सिंह यांनी क्लबहाऊसमधील ही ऑडिओ क्लिप ट्विटरवर ही शेअर केली आहे. "काँग्रेसचे पहिले प्रेम पाकिस्तान आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचा संदेश पाकिस्तानला दिला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानला मदत करेल," अशा शब्दात गिरीराज सिंह यांनी टीका केली आहे.

SAD – BSP Alliance : पंजाबमध्ये ठरलं किती जागा लढणार.. 
 
नवी दिल्ली : पंचवीस वर्षानंतर पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आले आहे. आज अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, बसपाचे महासचिव सतीश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढणार यांची माहिती दिली. सुखबीरसिंग बादल म्हणाले, "पंजाबमधील राजकारणाचा हा ऐतिहासिक दिवस आहे. अकाली दल आणि बसपा यांची विचारसरणी दूरदर्शी आहे. दोन्ही पक्ष हे कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. या युतीमुळे पंजाबची आर्थिक व्यवस्थेचा विकास होईल." "सुखबीरसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार स्थापन होईल," असे सतीश मिश्रा यांनी सांगितले. 
 Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख