पगार हवा असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या...जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र - bihar government employees will get salary only after both doses corona vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पगार हवा असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या...जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

पटना : बिहारमध्ये आरोग्ययंत्रणा व्हेटिंलेटरवर असून मृत्यूदरातही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात अॅाक्सिजनचा तुटवडा असून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी अहमदाबाद येथून रेमडेसिविर इंजेक्शनाची मागणी केली होती. आज १४ हजार रेमडेसिविर अहमदाबाद येथून विमानाने बिहारमध्ये येणार आहे.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी टि्वट करून ही माहिती आहे. बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी याबाबतची प्रशासकीय तयारी केली आहे. बिहारमध्ये दररोज १२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. लशीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

बिहारमध्ये सध्या एका पत्राची चर्चा आहे. 'पगार हवा असेल तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या,' असे पत्र गया आणि बेगुसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लिहिलं आहे. सध्या या पत्राची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. 'लशीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करा, पूर्ण पगार घ्या,' असे पत्रात नमूद केलं आहे. यासाठी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. गयाचे जिल्हाधिकारी अभिषेक सिंह यांनी हे पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिली होती, असे सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

हेही वाचा  : ठाण्यात अॅाक्सीजन न मिळाल्याने चौघांचा मृत्यू; नातेवाईक संतप्त
  
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशभरात मोठ्या प्रमाणावर अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. अॅाक्सीजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचे घटनाही अनेक ठिकाणी घडत आहेत. महाराष्ट्रातही हीच स्थिती असून सोमवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत या खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांना अॅाक्सीजन मिळाला नाही. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, तिघांचाही अचानक अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन नसल्यामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख