बिहारसाठी बिगुल वाजले, तीन टप्प्यात निवडणूक ,10 नोव्हेबरला निकाल  - Bihar, elections in three phases, results on 10 November | Politics Marathi News - Sarkarnama

 बिहारसाठी बिगुल वाजले, तीन टप्प्यात निवडणूक ,10 नोव्हेबरला निकाल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

एकून 243 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अशी माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिली. 

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या असून तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. 28 ऑक्‍टोबरला पहिल्या टप्प्यासाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी तीन नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

एकून 243 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अशी माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिली. 

तसेच दिवाळीपूर्वी म्हणजे दहा नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचेही अरोरा यांनी सांगितले 

आज देशभर शेतकऱ्यांनी कृषी आयोगाच्या विरोधात देश बंदची हाक दिली असताना दुसरीकडे बिहारसह मध्यप्रदेशमधील पोटनिवडणूकांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 

अरोरा म्हणाले, की कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांनी एक तर निवडणुका रद्द केल्या आहेत. तर काही देशांनी निवडणुका पुढेही ढकलल्या आहेत. बिहार विधानसभेचे कार्यकाळ येत्या 29 सप्टेबररोजी संपत आहेत. त्यामुळे येथे निवडणूक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे.

न्यू नॉर्मलमध्ये ही निवडणूक घेण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्राची संख्याही वाढणार आहे. कोरोनाचे नियम पाळूनच निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यात जेडीयूचे सरकार असून नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे सुशील मोदी आहेत. हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जेडीयू आणि राजदची सत्ता होती. पुढे नितीशकुमार यांनी राजदची फारकत घेऊन भाजपशी हात मिळविणी केली होती. 

सध्याचे पक्षिय बलाबल 
एकून जागा 243 
आरजेडी 86 
जेडीयू 71 
भाजप 53 
लोजप 02 
इतर 04 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख