#बिहार निवडणूक ; राजद 143 जागांवर रिंगणात उतरणार    - Bihar elections  RJD will contest 143 seats | Politics Marathi News - Sarkarnama

#बिहार निवडणूक ; राजद 143 जागांवर रिंगणात उतरणार   

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

विधानसभा निवडणुकीत राजद 143 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर काँग्रेस 70 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत. 

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 243 जागा असून  महाआघाडी सरकारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राजद 143 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर काँग्रेस 70 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत. 

बिहारमध्ये महाआघाडीत जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे. जागा वाटपबाबत राजदने आपल्या कोट्यातून मुकेश साहनी यांच्या विकासशील इंसान पार्टीला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवारांना 28 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे याबाबतचे वृत्त एनडीटिव्हीनं दिलं आहे. 

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्य्यासाठी या जागांवर सहमती झाली आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. महाआघाडी आणि एनडीएच्या मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस गती येईल. 
एनडीएमध्ये अद्याप जागा वाटप झालेल्या नाही. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यामुळे हा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नावे मागे घेण्याची अंतिम तारीख 12 आॅक्टोबर आहे.  

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.  बिहारमधील राजकारण आता तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिकयुद्ध सुरू झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकीची तारीख जाहीर होताच टि्वट करत प्रसाराचं रणशिंग फुंकले आहे.  बिहारमधील मतदारांना जनतेचं राज्य आणण्यासाठी आव्हान केलं आहे. याबाबत लालू प्रसाद  यादव यांनी टि्वट केलं आहे.  
 
बिहारमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रात एक हजार मतदारांना मतदान करता येणार आहे. यापूर्वी एका मतदार केंद्रात पंधराशे मतदार मतदान करू शकते होते. यामुळं या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढणार  आहे.  यंदा सकाळी सात ते सांयकाळी सहावाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. ऑनलाइन मतदान करण्यासाठी यंदा निवडणूक आय़ोगानं व्यवस्था केली आहे. कोरना रूग्ण आणि होम क्वारंटाइन रूग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 

निवडणुक आयोगानं यासाठी तयारी सुरू केली आहे. ४६ लाख मास्क, ६ लाख पीपीई किट, ७.२ कोटी सिंगल युज हॅण्डग्लोज, ७ लाख सॅनिटाइजर, २३ लाख ग्लोज आदींची व्यवस्था निवडणूक आयोगनं केली आहे. टपाल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रूग्ण आणि कोरोना संशयीत रूग्णांसाठी सांयकाळी शेवटच्या तासात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. 

कोरोनाचे नियम पाळूनच निवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यात जेडीयूचे सरकार असून नितीशकुमार हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे सुशील मोदी आहेत. हे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जेडीयू आणि राजदची सत्ता होती. पुढे नितीशकुमार यांनी राजदची फारकत घेऊन भाजपशी हात मिळविणी केली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख