Bihar Election 2020 : सत्ता आल्यास भाजप 19 लाख नोकऱ्या देणार ! 

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूशी भाजपशी आघाडी आहे
 Bihar Election 2020 : सत्ता आल्यास भाजप 19 लाख नोकऱ्या देणार ! 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याचे वैशिष्ठ्य असे आहे बिहारी जनतेला या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भरपूर काही देणार आहे.

बिहारी जनतेला भाजपने जे स्वप्न दाखविले आहे ते जर का वास्तवात आले तर बिहारचा विकास दूर नाही असा विश्वासही भाजप नेते व्यक्त करीत आहेत. 

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूशी भाजपशी आघाडी आहे. एनडीएतील एक मित्र लोक जनशक्ती पक्ष बाहेर पडला आहे. अर्थात नितीशकुमार यांना चिराग पासवान यांचा विरोध आहे. भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना बिहारी युवकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. लाख दोन लाख नव्हे तर 19 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. 

या राज्यातील लाखो लोक मुंबई, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात कामधंद्यासाठी जातात. बिहारमधून मोठ्याप्रमाणात स्थलांतरित होत असतात. कोरोनानंतर आलेले लॉकडाऊन, ते शिथिल झाल्यानंतर लाखो मजूर पुन्हा आपल्या राज्यात परतले आहेत.

बिहारमधील युवकांच्या नोकरीचा प्रश्‍न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे याच मुद्याकडे भाजपने लक्ष वेधले आहे. आपल्या जाहीरनाम्यात आता त्यांनी 19 लाख नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

या नोकऱ्याबरोबरच प्रत्येक बिहारी नागरिकाला मोफत कोरोना वैक्‍सीन देणार आहे. तसेच एक वर्षात तीन लाख शिक्षकांची भर्ती केली जाणार आहे. 

या महत्त्वाच्या आश्‍वासनाबरोबरच वैद्यकीय शिक्षण हिंदीत उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील पाच वर्षात आयटी हबची निर्मिती करणे त्यामध्ये पाच लाख नोकऱ्या तसेच कोट्यवधी महिलांना स्वावलंबी करण्याबाबतही या जाहीरनाम्यात उल्लेख आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.पुढील पाच वर्षाचा रोडमॅप भाजपने तयार केला आहे. कृषि क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com