बिहारचे डीजीपी पांडे, कंगनाने महाराष्ट्राची बदनामी केली, वडेट्टिवारांचा आरोप  - Bihar DGP Pandey, Kangana defamed Maharashtra, Vadettiwar alleges | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारचे डीजीपी पांडे, कंगनाने महाराष्ट्राची बदनामी केली, वडेट्टिवारांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

अभिनेत्रा सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण असो की कंगना राणावत सगळं विषय बिहार निवडणूक झाल्या की संपतील

मुंबई : सुशांत असो,कंगना असो सगळं विषय बिहार निवडणूक झाल्या की संपतील. अभिनेत्री कंगना राणावत असो की बिहारचे डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे असोत त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे असा आरोप कॉंग्रेसचे नेते आणि मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टिवार यांनी केला आहे. 

उद्या कंगनाला राज्यसभेचे खासदार केले तरी आश्‍चर्य वाटू नये असेही ते म्हणाले. 

पांडे असो कंगना ते राजकीय हेतूने प्ररित होऊन महाराष्ट्र सरकारवर टीका करीत होते असेही वडट्विवार म्हणाले. मराठा आरक्षण, ओबीसींचे प्रश्‍न आदी मुद्यावर ते बोतल होते. पत्रकारांशी बोलताना वडेट्टिवारांनी कंगना आणि पांडे यांच्यावर टीका केली. 

बिहारच्या डीजीपी व्हीआरएस घेतली असून ते राजकारणात उतरणार आहेत आणि निवडणूकही लढणार आहेत याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता वडेट्टिवार म्हणाले, की खरे तर आम्ही या विषयावर बोलणे टाळले आहे. त्यांची भूमिका काय आहे हे दिसत होते. पांडे हे यापूर्वीही राजकीय पक्षात जाऊन निवडणूक लढले होते आणि पुन्हा पोलीस सेवेत आले होते. आताही ते निवडणूक लढवित आहेत. त्यांची भूमिका ही प्रो भाजप आहे. 

अभिनेत्रा सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण असो की कंगना राणावत सगळं विषय बिहार निवडणूक झाल्या की संपतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, की 
कंगना असो पांडे असो ह्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. पांडे यांनी तर राजकारणासाठी महाराष्ट्राची बदनामी केली उद्या कंगनाला राज्यसभेवरही पाठवतील, या मंडळींचे आरोप हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित होते 

वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या ! 
मराठा समाजाला सरकार जे काही द्यायला तयार आहे तसेच ओबीसी समाजालाही मिळाले पाहिजे यासाठी वडेट्टिवार आग्रही आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार निधी दिला पाहिजे.तसेच इतर घटक नाराज होता काम नये.

ओबीसी समाजाचे वसतिगृह,कोळी,माळी,धनगर रोज कमवून खाणारे इतका मोठा वर्ग आहे. ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक विकास महामंडळ निधी उपलब्ध करून देण्याची आपली आग्रही भूमिका आहे 
या प्रश्‍नावर मी उद्या अजित पवार यांचीही भेट घेणार आहे. 

जो गरीब मराठा आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे स्पष्ट करतानाच ते म्हणाले, की निधी मिळावा यासाठी आग्रह असणार. ओबीसी आरक्षण 27% आहे विमुक्त भटक्‍या जमातींना 8% आहे.

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको ही आमची भूमिका राहणार याबाबत मुख्यमंत्री न्याय देतील असा मला विश्वास आहे. खासदा अमोल कोल्हे यांच्या मताशी मी सहमत नाही. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसींचे नुकसान नको अशी माझी भूमिका आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख