MPSC संदर्भात मोठी बातमी: पदे भरण्याचा मार्ग मोकळा   - Big news regarding MPSC-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

MPSC संदर्भात मोठी बातमी: पदे भरण्याचा मार्ग मोकळा  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

कोरोनासंकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली होती.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणाऱ्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागाचा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत 'एमपीएससी'कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात म्हटले आहे. (Big news regarding MPSC) 

हेही वाचा : पत्नीने बारामतीतून लोकसभा निवडणुक का लढविली, याचे राहुल कुल यांनी सांगितले हे कारण

एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखालील 28 जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, एमपीएसीच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. त्याबैठकीत एमपीएसच्या पदभरतीसंदर्भातील निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

कोरोनासंकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आली होती. 4  मे 2020 आणि 24 जून 2021 च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते. मात्र, विशेष बाब म्हणून एमपीएससी मार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. 

हेही वाचा : माझे मंत्रीपद का गेले, याचे उत्तर मिळाले तर मलाही शांती मिळेल!

पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी 30 सप्टेंबरपर्यंत एमपीएससीकडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात 15 हजार 500 हून अधिक पदांची भरती भरती करण्याचे विधीमंडळात जाहीर केले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख