मोठी बातमी : उत्तर प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीची युती

उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Sharad Pawar, Akhilesh Yadav .jpg
Sharad Pawar, Akhilesh Yadav .jpg

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देशपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पार्टीबरोबर युती करणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समाजवादी पार्टीसोबत (Samajwadi Party) मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस के. के. शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. (Big news: NCP-Samajwadi Party alliance) 

शर्मा मंगळवारी लखनऊमध्ये होते. उत्तर प्रदेश प्रेस क्लबमध्ये शर्मा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू, असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात देखील भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे समाजवादी बरोबर आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजपला रोखू, असे शर्मा म्हणाले आहेत. 

शर्मा यांनी यावेळी सांगितले की, 'पक्षप्रमुख शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसला उत्तर प्रदेशातील तरुण आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवावा लागेल. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे. जो कोणी आवाज उठवत आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांचा आवाज दडपला जात आहे.

शर्मा म्हणाले, जबरदस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे, परंतु जर कोणी स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर करीत असेल तर त्याला हकरत नसावी. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी सांगितले की ''१ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर 'राज्य वाचवा, संविधान वाचवा' आंदोलन सुरू करणार आहे. ज्यामध्ये शेतकरी व युवकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.  

Edited By - Amol Jaybhaye   
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com