'या' गावातील राम मंदिराचे भूमिपूजन पोलिसांनी रोखले.. - Bhumi Pujan of Ram Mandir stopped by police .. | Politics Marathi News - Sarkarnama

'या' गावातील राम मंदिराचे भूमिपूजन पोलिसांनी रोखले..

महेश जगताप
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी मुस्लिम समाजातील मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी जय्यत तयारी केली होती.

पुणे : अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत असतानाच माढा तालुक्यातील मानेगाव येथील नागरिकांनी नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन करण्याचे ठरवले. त्यामुळे गावातील सर्व नागरिक सर्व तयारी करून आनंदात असतानाच सकाळी सात वाजता पोलिस प्रशासनाच्या गावात गाड्या पोहोचल्या आणि भूमिपूजनाला परवानगी नाकारली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या या आनंदावर विरजण पडले.

माणेगाव गाव हे सोलापर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येचे गाव. गावात राम मंदिर नसल्याने नागरिकांनी काही महिन्यापूर्वीच राम मंदिर उभारण्यासाठी लोकवर्गणीतून आपल्या गावात मंदिर असावे, यासाठी प्रयत्न करत होते. पण अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन असल्याने आपल्याही मंदिराचे भूमिपूजन याच दिवशी का नसावे, असा विचार गावकऱ्यांनी केला.

त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत यामध्ये मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात सामील झाला होता. व एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी मुस्लिम समाजातील मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी जय्यत तयारी केली होती. काल गावातील सर्व नागरिक एकत्र सुरू होण्यास सुरुवात झाली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते . पण सकाळी सकाळीच पोलिस प्रशासनाच्या गाड्या गावात येऊ लागल्या. त्यामुळे गावातील नागरिक हवालदिल झाले. व गावकऱ्यांनी अधिक माहिती घेतली असता. तुम्हाला कोणतेही ही हालचाल करता येणार नाही. भूमिपूजनास सक्त मनाई आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. व कुणी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद केला जाईल, असे सांगण्यात आले.

 

विश्वजीत  पाटील यांनी सरकारनामाशी संवाद साधताना आम्ही मोठ्या प्रमाणात जय्यत केली होती. प्रसादाचे ही नियोजन करण्यात आले होते. सर्व नागरिक आनंदात होते पण पोलीस प्रशासनाने यावर पाणी फिरवले. गावातील नागरिक भास्कर कदम यांनी सरकारनामाशी संवाद साधताना काल राम मंदिराचे मुस्लिम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून गावात एकोप्याचे दर्शन आम्ही घडवणार होतो.

गेली काही दिवस गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. पण अचानक पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली, त्यामुळे नागरिक निराश झाले. तरी आम्ही पुढील काही दिवसात या मंदिराचे भूमिपूजन करणार आहोत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख