भीमा कोरेगाव प्रकरण आयोगाला मुदतवाढ मिळणार..?  - Bhima Koregaon Commission will get extension | Politics Marathi News - Sarkarnama

भीमा कोरेगाव प्रकरण आयोगाला मुदतवाढ मिळणार..? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

भीमा कोरेगाव आयोगाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयोगाचे काम ठप्प झाले होते. याबाबत मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख मंत्र्यांसोबत आज बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित होते

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर आयोगाला मुदतवाढ मिळाली. त्यानंतर कोरोनामुळे आयोगाचे बंद होते. भीमा कोरेगाव आयोगाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला देण्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक निरपराध व्यक्तींना गुंतविण्यात आले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल साधारण पाऊण तास चर्चा झाली होती.  मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, पोलीस अधिकारी बदल्या यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. 

मराठा आरक्षणाबाबत आज ठरणार रणनिती..उपसमितीची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय न्यायूमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने काल दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती व पुढील रणनितीवर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य सरकारचे वकिल व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख