चारशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष या मंत्र्यांमुळे वाचणार....

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील ४०० वर्षापूर्वीचा वटवृक्ष वाचणार आहे.
Aditya Thackeray.jpg
Aditya Thackeray.jpg

पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील ४०० वर्षापूर्वीचा वटवृक्ष वाचणार आहे. याबाबतचे टि्वट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग या वटवृक्षाचे जतन करणार असून महामार्गाच्या कामात काहीसा बदल करण्यात येणार आले, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांनी टि्वटरवरून दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग या  वटवृक्षाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील भोसे गावातील 400 वर्षापूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले होते. ऐतिहासिक वारसा असलेला हा वृक्ष वाचवण्यासाठी ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमींनी लढा उभारला होता. त्या लढ्याला मंत्री आदित्य ठाकरे यांचे बळ मिळाले होते.  रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज -सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर भोसे गावाजवळ एक चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड आहे. 

या परिसरातील हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. या झाडावर पक्षांची घरटी आहेत. या परिसरातील एक ऐतिहासिक वारसा म्हणून या झाडाकडे बघितले जाते. त्यामुळे महामार्ग होत असताना हे झाड वाचावे, अशी लोकांची भूमिका आहे. याबाबत ग्रामस्थांनी खासदार संजय पाटील यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबतच्या आपल्या भावना पोहोचवल्या होत्या.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही याबाबत पत्र लिहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ,'हा ऐतिहासिक ठेवा जपण्याबाबत विनंती केली होती. आदित्य ठाकरे यांनी, नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात ,'रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर-नागपूर या महामार्गाचे काम अतिशय गतीने सुरू असल्याबद्दल आपले आभार. याच मार्गालगत भोसे येथे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. दुर्मिळ पक्ष्यांचे आश्रयस्थान आणि त्या परिसरातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या वटवृक्षाचे जतन व्हावे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वटवृक्ष वाचवावा."अशी विनंती केली होती.  भोसे गावातील ग्रामस्थांनी झाड वाचवून पर्यायी  मार्गाने रस्ता करावा, अशी विनंती करत तसा मार्ग सुचवला आहे.
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा :  गणेशभक्तांसाठी गुड न्यूज : एसटीने जाणार कोकणात...

मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकारमान्यांना एक गुड न्यूज दिली आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन काही नियम व अटींवर कोकणात गणपतीसाठी एसटी सोडण्यात येणार आहेत. या मुद्यांवरून अनेक दिवस राजकारण तापले होते. या वादात अनेक नेत्यांनी उडी घेतली होती.  अनिल परब म्हणाले,  "मुंबई , पुणे या परिसरातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात गणपतीसाठी जाता यावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत.  राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे.  नियमांचे पालन करूनच गणेशभक्तांना कोकणात जाता येणार आहे"
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com