विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कॉंग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील! - Balasaheb Thorat criticizes BJP over assembly elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत कॉंग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

महाविकास आघाडी सरकारकडे संख्याबळ आहे तर ते निवडणुकीपासून पळ का काढत आहेत.

मुंबई  : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदानाने करण्याचा बदल उपाध्यक्षाच्या अखत्यारीत होत नाही, असे नमूद करतानाच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारकडे संख्याबळ आहे तर ते निवडणुकीपासून पळ का काढत आहेत असा प्रश्न केला आहे. Balasaheb Thorat criticizes BJP over assembly elections

हे सरकार आपापसातील वादांमुळेच पडेल त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज नाही. हे सरकार पडल्यावर आम्ही विकल्प देवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र कॉंग्रेसची नव्हे तर भाजपची मते अध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान फुटतील असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नमूद करत प्रतिहल्ला चढवला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही विधानसभेच्या अध्यक्षांची निवड न झाल्याने काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी नाराज झाले आहेत. या संदर्भात नक्की काय झाले, त्याची माहिती द्या, असे दूरध्वनी काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीहून करण्यात आल्याचे समजते. 

आमदारांच्या मतदानाबद्दल विश्वास नव्हता तर, गुप्त मतदानाची अट बदलून नियम समितीत त्यात बदल घडवून आणता आला असता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ६ जुलै) त्यासंबंधी बैठक झाली. ही बैठक आधी का घेण्यात आली नाही? भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांचे निलंबन झाल्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा आग्रह का धरला नाही, असे प्रश्नही संबंधित नेत्यांना करण्यात आले आहेत.

अधिवेशनात काँग्रेस सहा विषयावर करणार मोदी सरकारची कोंडी  

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन Monsoon Session Of Parliament ता. १९ जुलै रोजी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने आपली रणनिती  बनविली आहे. यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत सहा विषयांवर (6 Points Agenda)मोदी सरकारची कोंडी करण्याची रणनिती Parliamentary Strategy Group Meet तयार करण्यात आली. या बैठकीला माजी पंतप्रधानमंत्री मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, अधीर रंजन चैाधरी, मल्लिकार्जुन  खरर्गे, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी, मनीष तिवारी, वेणुगोपाल, जयराम रमेश आदी नेते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख