आवताडेंच्या विजयाचे श्रेय बाळाभाऊ अन् महेशदादांचेही  - Bala Bhegade and Mahesh Ladge also participated in Samadhan Avtade victory | Politics Marathi News - Sarkarnama

आवताडेंच्या विजयाचे श्रेय बाळाभाऊ अन् महेशदादांचेही 

उत्तम कुटे 
सोमवार, 3 मे 2021

भाजपने ही जागा मोठी प्रतिष्ठेची केल्याने तेथील प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेते उतरले होते.

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयात मावळ आणि भोसरीचाही वाटा आहे. त्याचे मोठे श्रेय हे भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी व मतदारसंघाचे प्रचारप्रमुख असलेले मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांच्या योग्य प्रचार नियोजनालाही जाते.

भाजपने ही जागा मोठी प्रतिष्ठेची केल्याने तेथील प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेते उतरले होते. मात्र, भेगडेंएवढा म्हणजे सलग १५ दिवस बाहेरचा कुठलाही नेता तेथे तळ ठोकून नव्हता. सर्व नेत्यांचा प्रचार व सभांचे नियोजन त्यांनी केले. प्रचाराच्या सुरवातीपासून तो संपेपर्यंत ते हालले नाही. शेवटी कोरोनाने गाठले तेव्हा ते मतदानाच्या दिवशी तळेगाव दाभाडे येथे घरी आले.

शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

प्रचाराचे सुयोग्य नियोजन करून ते थांबले नाहीत, तर स्वतः ही त्यात उतरले. नेते, कार्यकर्ते एकत्र आणले. अखेर त्यांचे परिश्रम कामी आले. त्यासाठी त्यांना भोसरीचे पक्षाचे पैलवान आमदार महेश लांडगे यांची सुद्धा मदत झाली. घरात लगीनघाई (कन्येचा विवाह) असतानाही वेळात वेळ काढून दोन दिवस पंढरपूर-मंगळवेढ्यात जाऊन महेशदादांनी जोरात प्रचार केला होता. 

हे ही वाचा 

हा भालकेंचा नाही, तर अजित पवार यांचा पराभव; बाळा भेगडेंचा हल्लाबोल 

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील पराभव हा भगीरथ भालकेंचा नाही, तर तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी आणि माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी दिली. या निकालाने राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल, असे ते ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

राज्याचे लक्ष लागून असलेल्या या विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाने राज्यातील घडामोडी बदलतील, असे भाकीतही भेगडेंनी केले. हा निकाल राज्य सरकार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. कारण पंढरपूर-मंगळवेढ्यातील गल्लीबोळात उतरून पवारांनी प्रचार केला. ते स्वतः पाच दिवस तेथे तळ ठोकून होते.

रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!
 

मंत्रीमंडळही त्यांनी प्रचारात उतरवले होते. मात्र, त्यांच्या प्रचाराच्या भुमिकेला स्थानिक जनतेने नाकारले. कारण त्यांचं पाणी पवारांनी पळविलंय. त्याचा राग निकालातून मतदारांनी बाहेर काढला. दीड वर्षातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधातील राज्यातील जनतेचा रोष पंढरपूर-मंगळवेढ्याच्या मतदारांनी व्यक्त केला, असेही भेगडे म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख