बसपा नेत्या मायावती यांचे वडिल प्रभू दयाल यांचे निधन  - Bahujan Samaj Party Sarvesarva Mayawati father Prabhu Dayal passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

बसपा नेत्या मायावती यांचे वडिल प्रभू दयाल यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

प्रभु दयाल हे सरकारी नोकरीत होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते दिल्ली येथे वास्तव्यास होते. 

नवी दिल्ली  : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे वडिल प्रभु दयाल (वय95) यांचे निधन झाले. प्रभु दयाल हे दिल्ली येथे रकाबगंज येथे राहत होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. मायावती या मुळच्या गैातमबुद्धनगर जिल्ह्यातील बादलपूर या गावाच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडिल प्रभु दयाल हे सरकारी नोकरीत होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते दिल्ली येथे वास्तव्यास होते. 

दिल्ली येथे मायावती आणि बहिण-भावांचे शिक्षण झाले. मायावती यांना सनदी अधिकारी बनविण्याची प्रभु दयाल यांची इच्छा होती. पण मायावती या बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मायावती यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. 

प्रभु दयास यांच्या निधनानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ, बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभेचे खासदार सतीश चंद्र मिश्रा यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी टि्वट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

हेही वाचा  : सरकारची नवी योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी.."  
मुंबई :  'वाढीव वीज बिल भरू नका,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना काल केलं आहे. वाढीव बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात आहे. वाढीव बिलाबाबत राज्य सरकारनं सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा, अनथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाढीव वीज बिलांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. किरिट सोमय्या यांनी याबाबत टि्वट केले आहे.  सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो शेअर केला आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी,” असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख