बदलापूर : बदलापूर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एका परप्रांतीय फेरीवाल्याला चोप दिला आहे. चोप देतांनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बदलापूरच्या बेलवली भागात एका मराठी महिलेने खाद्यपदार्थाची हातगाडी लावली होती.
मात्र, इथे खाद्यपदार्थाची गाडी लावणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याने माझी गाडी इथे लागते तुम्ही कोणी लावायची नाही, अशी दमदाटी या महिलेला केली. दरम्यान बदलापूर मनसेचा महिला कार्यकर्त्यांना ही बाब समजताच त्यांनी या फेरीवाल्याचा समाचार घेत त्याला चोप दिला. याप्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीकडून शरद पवारांना वाढदिवसाची मोठी भेट..! #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #SharadPawar #NCP #UddhavThackeray #MVA #Viral #ViralNews @NCPspeaks https://t.co/7uKuDmfZ6R
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 9, 2020
हेही वाचा महादेव जानकर मनातील चुकून खरे बोलून गेले...
पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे मोकळंढाकळं बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. जे पोटात तेच ओठात, असा त्यांचा खाक्या असतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन डिसेंबर रोजी त्यांनी भेट घेतली. त्या भेटीची बातमी सात डिसेंबर रोजी बाहेर आली. त्यानंतर साहजिकच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. जानकर हे आता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडण्याच्या बेतात असून ते महाविकास आघाडीत येतात की काय, अशी शंका येऊ लागली. या भेटीबद्दल त्यांनी आठ डिसेंबर रोजी स्पष्टपणे काही बाबी सांगितल्या. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्यांसदर्भात ते पवारांना भेटले होते. मी `एनडीए` सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते स्पष्टीकरण अनेकांना पटले. मात्र, काल वालचंदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांच्या तोंडून सहज वाक्य निघून गेले. देवेंद्र फडणवीस आणि माझे भांडण आहे. मात्र त्या भांडणाचा फायदा राजकीय विरोधकांना होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे साहजिकच पुन्हा जानकर यांच्या मनात वेगळेच सुरू असल्याचे समोर आले. जानकर नाराज का आहेत, याचेही कारण शोधण्यास मग सुरवात झाली.

