रक्तदान करून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्लीकडे रवाना.. - Bachchu Kadu left for Delhi to support the farmer by donating blood Agiculture Act | Politics Marathi News - Sarkarnama

रक्तदान करून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दिल्लीकडे रवाना..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

धौलपूरवरून उत्तर प्रदेशात प्रवेश करीत असताना पोलिसांनी बच्चू कडू यांचा ताफा अडविला होता.

भरतपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी (ता. 10) भरतपूरला रक्तदान करीत पलवलकडे प्रस्थान केले. रक्तदानात हजारो समर्थकांसोबत स्थानिक शेतकरी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.

धौलपूरवरून उत्तर प्रदेशात प्रवेश करीत असताना पोलिसांनी बच्चू कडू यांचा ताफा अडविला होता. त्यामुळे रात्री भरतपूरला मुक्काम केल्यानंतर गुरूवारी (ता. 10) शेतकऱ्यांप्रती निष्ठा जपत व  अहिंसा मार्गे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा या भावनेतून आयोजित रक्तदान शिबिरात स्वतः बच्चू कडू यांनी रक्तदान केले. त्यानंतर ते पलवलच्या दिशेने रवाना झाले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे एक मंत्री एवढे सकारात्मक व संवेदनशील असल्याचे पाहून भरतपूरवासियांनी पहाटेपासून त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. डिसेंबरमध्ये रक्ताची मोठी गरज भासते. आणि बच्चू कडू यांचा जसा शेतकऱ्यांप्रती कळवळा आहे, तसाच तो रूग्णांप्रती देखील आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता बच्चू कडू यांच्यासह हजारो समर्थक व स्थानिकांनी रक्तदान केले. भरतपूर येथून ते निघाले असून मथुरा-वृंदावन मार्गे ते नवी दिल्लीकडे रवाना होतील. 

दानवेंच्या वक्तव्यावरून भारताने चीनवर हल्ला करावा..राऊतांचा टोला 
मुंबई : शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
 
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "आम्ही रावसाहेब दानवे यांचे आभारी आहोत. त्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. दानवे यांच्या विधानाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. दानवे यांच्याकडे याबाबत काहीतरी सबळ पुरावे असले पाहिजे म्हणून त्यांनी हे विधान केलं असावं. दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून भारताने चीनवर हल्ला केला पाहिजे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख