औरंगाबाद नामांतराबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणणार..   

नामांतराबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते, मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
es17.png
es17.png

सोलापूर : संभाजीनगर हा लोकांच्या अस्मितेचा विषय आहे. औरंगजेबचा बाबतीत कोणाचं प्रेम असण्याचं काहीच कारण नाही, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचा सोलापुरात दैारा होता. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

औरंगाबादच्या नामांतर विषयावर बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, '' संभाजीनगर हा तिथल्या स्थानिकांच्या अस्मितेचा विषय आहे, गेल्या अनेक वर्षापासून संभाजीनगर असाच नामोलेख शिवसेना आणि स्थानानिकांकडून केला जातो. सरकार तिथल्या नागरिकांच्या भावनेचा कदर करणार आहे, तसेच जे लोकांना हवा आहे ते सरकार निर्णय घेणार आहे. दरम्यान औरंगजेबाच्या बाबतीत कोणाचं प्रेम असण्याचं काहीच कारण नाही, नामांतराबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते, मुख्यमंत्री निर्णय घेतील.''  

हेही वाचा :  औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसमोर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या भूमिकेवर शिवसेनेने सामनामधून टीकेचे बाण सोडले आहेत. रोखठोक या सदरातून खासदार संजय राऊत यांनी बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? असा सवाल उपस्थित करून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. हिंदुस्थानची घटना 'सेक्युलर' आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात?

औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले.त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही, असे रोखठोक मध्ये म्हटलं आहे.  
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com