पोलिस उपायुक्त मॅडमला हवी आहे, चिकण बिर्याणी तीही मोफत!  - audio clip of pune DCP goes viral bring free biryani-mm76  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पोलिस उपायुक्त मॅडमला हवी आहे, चिकण बिर्याणी तीही मोफत! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 जुलै 2021

आपल्या हद्दीत पोलिसांनी हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे?

पुणे : लाचखोर अन् कामचुकार अधिकाऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण एका महिला पोलिस Pune Police अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे. पुण्यातील पोलिस उपाआयुक्त DCP असलेल्या या अधिकाऱ्यांच्या अशा कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि ती मोफत बिर्याणीची मॅडमची फर्माईशची आँडिओ क्लिप audio clipपोलिस महासंचालकांना पाठविली आहे.  

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका

पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम  त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप पाच मिनिटांची आहे. यात मॅडम त्या कर्मचाऱ्याला पुण्यातील नाँनव्हेज पदार्थ कुठे चांगले मिळतात, याबाबत विचारत  आहेत. 'आपण यापूर्वी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणतो,' असे त्या कर्मचाऱ्यांने पोलिस उपायुक्त मॅडमला सांगितले. त्यावर मॅडम म्हणतात की, आपल्या हद्दीत पोलिसांनी हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा प्रश्न  केला आहे. 

आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांसाठी होता?
तर मॅडमच्या पतीना मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या  मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. 'तुम्ही सांगणार की बोलू' असेही त्या कर्मचाऱ्याला म्हणाल्या. अखेर मॅडमच्या या कारभाराला त्रस्त होऊन त्या कर्मचाऱ्याने महासंचालकाकडे दाद मागितली आहे. आता पोलिस महासंचालक या पोलिस उपायुक्त मॅडमवर कारवाई करतील का, हे लवकरच कळेल 

अधिकाऱ्यांना वेठीस धरून  आपल्या पदाचा दुरुपयोग करून जबरदस्तीने  पैसे जमा करण्यास सांगतात  त्यांचे नाही ऐकले तर त्या पी आय ची बदली  करण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरतात.  त्यांना पोलिस स्टेशन हद्दीतून सर्व फुकट हवे असते  पीआयनी पैसे मागितले तर त्याच्यावर डाव धरून त्याचे नुकसान करतात  . यापूर्वी दोन पीआय व एक एसीपी यांचं नुकसान त्यांनी केलं आहे  सध्या झोनमधील दोन पीआय याना खूप त्रास देत आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी  कारवाई  नाही केली तर पोलिसांचा  सहनशिलतेचा अंत होऊ शकतो.  अशा अधिकारी इंग्रज काळातील  हुकूमशाही  गाजवून अधिकारी कर्मचा यांना वेठीस धरत आहेत अशा अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर दिल्यास हे त्याचा गैरफायदा घेऊन लोकांना हद्दीतील अधिकाऱ्यांना काही करावयास सांगून पोलिसांची जनसामान्यांमध्ये प्रतिममा खराब करत आहेत, असे महासंचालकाना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख