धनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा ! 

मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे.
Atul Bhatkhalkar's attack on Uddhav Thackeray who criticized the Governor
Atul Bhatkhalkar's attack on Uddhav Thackeray who criticized the Governor

मुंबई : "धनुष्य बाणवाल्यांचा बाणा...राज्यपालांसमोर पिळतात मिशा आणि जनपथसमोर उठाबशा...दार उघड भावा, दार उघड...' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

राज्यातील मंदिरे उघडण्यावरून आज (ता. 13 ऑक्‍टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्याला उत्तर देताना ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी ठाकरे यांच्यावर चोहोबाजूंनी टीकास्त्र सोडले आहे. 

मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसात मंदिरं उघडा किंवा बार रेस्टॉरंट तरी बंद करा, असा टोला भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

नवरात्र-दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत मंदिरं उघडली नाहीत, तर तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. भातखळकर यांनी या संदर्भात एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी किमान हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी विसरू नये, त्यांचे हिंदुत्व तरी पाळावे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी बार उघडण्यापूर्वी शंभर टक्के मंदिरं खुली केली असती. सणासुदीचे दिवस येत असताना तरी हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन मंदिरं लवकरच उघडावी, असे आवाहनही भातखळकर यांनी केले आहे. 

मंदिरं उघडायची नसतील तर यापूर्वी खुले केलेले बार व रेस्टोरंट बंद करा. केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतोय, अशा खोट्या भूलथापा देणे बंद करा. कारण मंदिरं बंद असतानाही इतके दिवस महाराष्ट्र ही देशातील कोरोनाची राजधानी तुम्ही करून दाखवली होती. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पाळून मंदिरे त्वरेने खुली करा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com