लग्नसोहळ्यात ७६ जणांची उपस्थिती...६४ हजारांचा दंड - Attendance of 76 people at the wedding ceremony 50 thousand fine | Politics Marathi News - Sarkarnama

लग्नसोहळ्यात ७६ जणांची उपस्थिती...६४ हजारांचा दंड

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

हेमंत मखिजा असे गुन्हा दाखल झालेल्या हॅाटेल मालकांचे नाव आहे.

लोणावळा :  कोरोना संक्रमण काळात लग्न सोहळ्यावर अनेक निर्बंध  आहेत. दोन तासाच्या आत लग्न आणि 25 पेक्षा जास्त लोक नकोत असा नियम आहे, असे असतानाही लोणावळा येथे या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. या ठिकाणी एकूण ७६ जणांची उपस्थिती होती. 

कोविड १९ नियमाचे उलंघन केल्याप्रकरणी लोणावळा येथील ग्रॅड विसावा या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल व लग्न सोहळयातील कुटुंबावर ५० हजाराचा दंड व एकुण १४ लोकांवर सोशल डिस्टन्सींग अन्वये दंडात्मक करवाई करुन १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  

हेमंत मखिजा (वय ४२ वर्षे रा. उल्हासनगर ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या हॅाटेल मालकांचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशानुसार आदेशान्वये सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कॉवत याच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसापुर्वी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथे वाजत गाजत लग्न लावण्यात आले. याची माहिती देवनी येथील तहसीलदार सुरेश घोळवे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ लग्न मंडपात जाऊन परिस्थितीची स्वत: पाहिली केली. त्यावेळी तेथे 125 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. याप्रकरणी संबधितांना 50 हजारांचा आर्थिक दंड लावण्यात आला आहे.

प्रशासन हजर झाले असे लक्षात आल्याने मंडपातील अनेकांनी काढता पाय घेतला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव यांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 50 हजारांचा आर्थिक दंड लावण्यात आला आहे. गट विकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव आणि भरारी पथकातील कर्मचारी यावेळी हजर होते. 

या वर्षी लॉकडाऊननंतर राज्यात ब्रेक द चेन अंतर्गंत अनेक निर्बंध लादण्यात आले आहे.  ५० जणांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर पाळून मंगलकार्यालयात लग्न सोहळ्याचे आयोजन याआधी करता येत होते. मात्र आता २५  पेक्षा जास्त लोक नको, अशी अट घालण्यात आली आहे. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानं अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळं दिवाळीनंतर लग्न सोहळ्याची लगबग सुरू झाली. यंदाही मार्चपासून लग्न सोहळ्यास सुरवात झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख