पार्थ पवार यांच्या मावसभावावर दगडफेक

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
Copy of देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष (4).jpg
Copy of देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष (4).jpg

उस्मानाबाद :  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पारडी फाटा येथील घाटात रात्री घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आदित्य गोरे हे राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे मावसभाऊ आहेत.  

याबाबत वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला आदित्य गोरे जात होते. तेव्हा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नाही, या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. हल्ल्यात गाडीची मागील एक काच फुटली असून कोणीही जखमी नाही. आदित्य गोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेहुणीचे चिरंजीव आहेत.  

पुणे :  पुण्यातील एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींचे Narendra Modi मंदिर उभारले आहे. सर्वसामान्यांसाठी मोदींचे मंदिर हा चर्चेचा विषय ठरले आहे.  पुण्यातील औंध Aundh भागामधील मयूर मुंढे  Mayur Mundhe या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले होते. पण आता हे मंदिर रातोरात हटवण्यात आले आहे. मोदींचा हा पुतळा एका नगरसेवकाच्या कार्यालयात हलवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आज या पुतळयाला  नैवेद्य दाखवायचा इशारा देण्यात आला होता मात्र त्याआधीच हा पुतळा तिथून हलवण्यात आला आहे. 

समाजवादी पक्षाच्या खासदाराविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे.  अफगाणिस्तानात बंदुकीच्या बळावर सत्ता काबीज करणाऱ्या कट्टरपंथी तालिबानी दहशतवाद्यांना अखिल भारतीय मुस्लिम लॉ पर्सनल बोर्ड (एआयएमएलपीबी) या भारतीय मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने पाठिंबा दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com