सचिन वाझेंच्या विरोधात ATS कडे परिस्थितीजन्य भक्कम पुरावे.. - ATS has strong circumstantial evidence against Sachin Waze  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सचिन वाझेंच्या विरोधात ATS कडे परिस्थितीजन्य भक्कम पुरावे..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

ATS ने ठाणे न्यायालयात ४ पानी अहवाल सादर केला आहे.  

मुंबई :  सचिन वाझे प्रकरणाची सुनावणी काल ठाणे न्यायालयासमोर झाली. यावेळी एटीएसने (ATS)  न्यायालयात आपले लेखी उत्तर सादर केले. आता पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.

याप्रकरणात काल एनआयए आणि एटीएस यांना 17 जानेवारीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, यात मनसुख हिरेन आणि वाझे एकत्र असल्याचे दिसत आहे. काल ATS ने ठाणे न्यायालयात ४ पानी अहवाल सादर केला आहे.  

एटीएस (ATS) ने न्यायालयात सादर केलेले महत्वाचे मुद्दे 

  1. ता. २५ फेब्रुवारीच्या दिवशी वाझे कार मायकल रोड (Mumbai Carmichael Road)  जाण्याचे कारण काय होते? 
  2. त्यांच्याकडे तपास ही नव्हता आणि त्याचे अधिकार क्षेत्र ही नव्हते मनसुख हिरेन ता. ४ मार्चला रहस्यमय रित्या गायब झाले  
  3. ४ मार्च आणि ५ मार्च दरम्यान सचिन वाझे यांनी त्यांच्या नेहमीच्या फोन नंबर वरुन फोन करण्यात आले नाही. 
  4. मनसुख हिरेन यांची पत्नी, मुलगा आणि भावाने काही व्हिडिओ दिलेत जो सचिन वाझें विरोधात सक्षम पुरावा आहे.
  5. ता. ४ मार्च रोजी मनसुख हिरेन आणि सचिन वाझे व्हाटसप काँलवरुन संपर्कात होते 
  6. सचिन वाझे यांच्या विरोधात परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत.. उदा.सचिन वाझे रेग्युलर रुटीन च्या बरोबर विरोधात वागत होते
  7. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन अनेकदा छोट्या मोठ्या फाईव्ह स्टार हाँटेल मध्ये भेटल्याचे पुरावे आहेत. 
  8. फेब्रुवारी महिन्यात जास्त वेळ मनसुख आणि सचिन वाझे यांच्या भेटी झाल्याचे ATS कडे पुरावे आहेत.
  9. ता. १७ फेब्रुवारी पासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे आणि मनसुख हिरेन सतत संपर्कात होते.
  10. ता.२५ फेब्रुवारीनंतर सचिन वाझे आणि मनसुख हे जास्त काळ संपर्कात होते 

हेही वाचा : सचिन वाझेंनी बनावट नंबरप्लेट खाडीत फेकल्या...NIA ला संशय.. 

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए)च्या तपासात पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेंनी काही वाझेने काही बनावट नंबरप्लेट पाण्यात म्हणजेच खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही (CCTV), आणि डिव्हिआरमध्येही छेडछाड केली असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती एनआयए (NIA)च्या सूञांकडून समजते.   
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख