अश्विनी कदम..आबा बागुल यांचे भांडण..आमदारांवर सोपवली जबाबदारी...

तळजाई प्रकरणात राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम आणि कॅाग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांच्यामध्ये वाद आहे.
ashwini
ashwini

पुणे : दोन नगरसेवकांमध्ये भांडण, आयुक्तांची मध्यस्थी...पालकमंत्री बैठक बोलवितात अन् याबाबतची जबाबदारी मात्र, आमदारांवर सोपवली जाते..हे राजकीय नाट्य नुकतेच पुण्यात रंगले. त्यामुळे 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' या म्हणीचा प्रत्यय आला. तळजाई प्रकरणात राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम आणि कॅाग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांच्यामध्ये वाद आहे.

तळजाई येथील जागेवर वन उद्यान विकसित करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात बैठक बोलावली होती. या बैठकीत या दोन्ही नगरसेवकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. आयुक्तांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला होता. 

खातेप्रमुखांसमोरच हा वाद झाल्याने महापालिका वर्तुळात चर्चचा विषय ठरला. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला आयुक्त आणि दोन्ही नगरसेवक उपस्थित होते. एका नगरसेवकाने या जागेवर पर्य़टन केंद्र उभारावे, तर दुसऱ्या नगरसेवकाने याठिकाणी वन उद्यान उभारावे, असा प्रस्ताव मांडला. दोन्ही आपल्या प्रस्तावावर ठाम होते. महापालिकेला उपन्न कसे मिळेल, यावर विचार करा, अशी सूचना आयुक्तांनी केली होती. 

तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार माधुरी मिसाळ यांना बोलविण्यास सांगितले. आमदार बैठकीला उपस्थित झाल्या. बैठकीत चर्चा रंगली. आधी न्यायालयीन वाद मिटवा नंतर निर्णय घेऊ असे ठरले. दोंघा नगरसेवकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा, असे म्हणत अजित दादांनी याबाबतची जबाबदारी आमदारांवर टाकली. आमदारांनी निर्णय घ्यावा, सरकार पातळीवर जी मदत लागेल ती मी देईल, असे अजितदादांनी सांगितले. यामुळे दोन्हा नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यातून आता काय वाद रंगणार, याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आमदार आणि दोन्हा नगरसेवकांचे संबध सर्वश्रुत आहेत. 

हेही वाचा : अजित पवार यांच्या आदेशानंतर आता विभागीय आयुक्तांनी दिला 'हा' आदेश 


पुणे : पुण्यात रोज कोरोना रुग्ण संख्येचा आकडा आठशे ते नऊशेच्या पुढे जात आहे. कोरोनामुळे मूत्यु होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाची चिता वाढली आहे. पुण्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. राज्य व स्थानिक प्रशासनाला चिंतेत टाकणारी ही बाब आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नवा आदेश काढला आहे. आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. 109 बाधित क्षेत्रात प्रशासनाच्या नियमांचे उल्लघंन होते आहे. ही बाबा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गांभीर्याने घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com