माजी मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला..आत्मचिंतन करा.. - Ashok Chavan criticizes Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

माजी मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला..आत्मचिंतन करा..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

देवेंद्र फडणवीस यांनी  आत्मचिंतन केले पाहिजे, असं टि्वट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.  

मुंबई :  डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टिका केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी टि्वट केलं आहे. 

डॉ. मनमोहनसिंग यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नसल्याने देश रसातळाला गेल्याचा बिनबुडाचा आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी मागील साडेसहा वर्षांपासून मंत्रिमंडळावर हुकमी वर्चस्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची कशी वाताहात झाली, याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असं टि्वट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.  

देश रसातळाला गेला म्हणणे ही फडणविसांची बौद्धीक दिवाळखोरी : थोरात

राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. याच तिमाहीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.थोरात म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देशानं ऐतिहासिक विकास दर गाठला एवढेच नव्हे तर त्या विकासाचा उपयोग हा जनहितासाठी करुन १४ कोटी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. यातून नवीन सकारात्मक आर्थिक वर्गवारी देशाला पाहायला मिळाली. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करुन जगाच्या इतिहासात प्रथमच अन्न सुरक्षा कायदा आणला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख