#मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांनी घेतली सरकारी वकिलांची भेट..

मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया यांच्या सल्ल्याबाबतही अशोक चव्हाण यांनी उभय वकिलांकडून विस्तृत माहिती घेतली.
2Maratha_20Samaj_0.jpg
2Maratha_20Samaj_0.jpg

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल नवी दिल्ली येथील सरकारी वकिलांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला.

नवी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत चव्हाण यांनी सरकारी वकील राहुल चिटणीस व सचिन पाटील यांच्याशी विचारविनिमय केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले आहे. या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. 

मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया यांच्या सल्ल्याबाबतही अशोक चव्हाण यांनी उभय वकिलांकडून विस्तृत माहिती घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे एसईबीसी प्रवर्गाचे नोकरभरतीतील उमेदवार व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही उणिव राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी लेखी मागणी राज्य सरकारने यापूर्वी तीन वेळा केलेली आहे. राज्य सरकारच्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी गेल्या २ नोव्हेंबर रोजी सांगितले होते. यासंदर्भातील अर्ज २० सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता व ७ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर रोजी तो मेन्शनही करण्यात आला आहे.

आज पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी..  
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे. श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन आज सकाळी 11 वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे 

आंदोलनामुळे येथील एसटीची सेवा ठप्प झाली आहे. यामध्ये एसटीला 20 लाख रुपयांचा फटका बसला आहे. आधीच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या एसटीला विविध आंदोलनांचा फटका सहन करावा लागत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवासी वाहतूक बंद ठेवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. संचार बंदी लागू केली आहे.
 पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com