सरकार आहे कि छळछावणी ?..आशिष शेलारांचा राज्य सरकारला जाब   - Ashish Shelar slams Maha Govt for decision on School Reopening | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

सरकार आहे कि छळछावणी ?..आशिष शेलारांचा राज्य सरकारला जाब  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

अनेक शिक्षक हे कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू करणं धोक्याचं असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कमी झाल्याचं चित्र समोर आलं होतं. परंतु पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. दिवाळीनंतर म्हणजे सोमवारी (ता.23) शाळा उघडणार आहेत. तर दुसऱ्याबाजूला अनेक शिक्षक हे कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू करणं धोक्याचं असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत.

शाळा सुरू करण्यावरून सध्या राज्य सरकारवर टीका होत आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी टि्वट करून राज्य सरकारला यावरून झोडपले आहे. शाळा सुरू करण्यातही सावळागोंधळ सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा संतप्त सवालही शेलार यांनी केला आहे.

आपल्या टि्वटमध्ये आशिष शेलार म्हणतात, "शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच..पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत ..भयभीत आहेत."

परिक्षा घेण्यावरुन सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. परिक्षा घेतल्या तर त्यात पालक विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. अँडमिशवरुन गोंधळ सुरू आहे. शुल्क वाढीच्या विरोधात सरकार काहीही निर्णय घेत नाही. यावरून सरकारची हतबलता दिसते. अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह आहे. शाळा सुरू करण्यात राज्यात सध्या तर सावळागोंधळ सरू आहे. महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?, असा सवाल शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख