मुंबईकरांना मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" शेलारांचा सरकारला टोला.. - ashish shelar criticizes thackeray government over metro car shed Politic news | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईकरांना मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" शेलारांचा सरकारला टोला..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020

शेलार यांनी मुंबईकरांच्या प्रवाशाची व्यवस्था मोडित काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टीका करीत आहे. 

मुंबई : कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिके मुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. शेलार यांनी मुंबईकरांच्या प्रवाशाची व्यवस्था मोडित काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत असल्याची टीका करीत आहे. 

याबाबत आशिष शेलार यांनी टि्वट केलं आहे. "बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करीत आहे. आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय...? मुंबईकर हो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा...मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!", असं टि्वट शेलार यांनी केलं आहे.

कारशेड  ‘आरे’मध्ये उभारायचे नाही, असं महाविकास आघाडी सरकारनं ठरविले असल्याने सध्या पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. या चर्चेतून वांद्रे-कुर्ला संकुलात कारशेड उभारण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.  यावरून शेलार यांनी महाविकास आघाडीचा सवाल केला आहे. मेट्रो कारशेडला विरोध करणार असाल तर बुलेट ट्रेनला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. 

हेही वाचा : निवडणूक बिनविरोध करा.. 21 लाख मिळवा..  

पिंपरी : बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीला बक्षीस देण्याची राज्यात आता शर्यतच सुरु झाली आहे. हे वारे आता मावळात (जि.पुणे) पोचले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी ११ लाख रुपये देण्याची घोषणा आज केली. त्याजोडीने विकासकामांना प्राधान्य देऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दहा लाख निधी असे एकूण २१ लाख रुपये मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत गावकी, भावकी, गटातटाचे वाद न होता त्या बिनविरोध व्हाव्यात, अशी शेळके यांची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या धर्तीवर 'माझं गाव, माझा स्वाभिमान' अभियान हाती घेतले आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख