"अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे "मेट्रो कारनामे"..शेलारांचा ठाकरेंवर निशाणा - Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray and Tourism Minister Aditya Thackeray over Metro | Politics Marathi News - Sarkarnama

"अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे "मेट्रो कारनामे"..शेलारांचा ठाकरेंवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा "मेट्रो कारनामे!" अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शेलार यांनी केली आहे. 

मुंबई : मुंबई मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. "आरे'ऐवजी  कांजूर येथे ही कारशेड होणार आहे. ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसापूर्वी केली आहे.  यावरून भाजपनेते राज्य सरकारवर टीका करीत आहे. आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत शेलार टि्वट करून सरकारवर टीका केली आहे. 

आशिष शेलार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "कांजुरमार्गच्या जागेचा निर्णय घेत आहेत, तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय ? असा सवाल त्याचवेळी आम्ही केला. तेच खरे ठरतेय. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता ? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा "मेट्रो कारनामे!" अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शेलार यांनी केली आहे. 

शेलार म्हणतात की गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील 500 एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या 100 एकर जमीनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे. मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने 16 एप्रिल 2016ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केला आहे.

इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या "सातबारा" आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना? असा टोला शेलार यांना हाणला आहे. 

हेही वाचा : वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही. दरेकरांचा इशारा

मुंबई : वाढीव वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी सत्तारुढ तसेच विरोधकांच्या लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अन्यथा वीजग्राहक मेळावे होऊ देणार
नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रश्नावर राज्य सरकार आणि उर्जामंत्री गेले चार महिने आश्वासने देऊन टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने नाडलेल्या ग्राहकांना सर्वप्रथम दिलासा द्या, असेही दरेकर यांनी
सांगितले आहे. 

महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतला आहे. कोरोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा केली. परंतु आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केले आहे. ही वीजबिले चुकीची असून ती वाढीव जादा रकमेची दिली आहेत. त्यामुळे यासंदर्भात सत्यशोधनासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती नेमावी.त्यातूनच सत्य बाहेर येईल, असेही दरेकर म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख