ठाकरेंचा चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!    - Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

ठाकरेंचा चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!   

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी प्रचंड विरोध केला होता.

मुंबई : आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून बरेच  राजकारण झाले. कांजूरमार्ग येथील जागेच्या मालकीवरून वाद सुरू आहे. कारशेडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या सुनावणीत एमएमआरडीएने दिलेल्या माहितीवरून भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार Ashish Shelar) यांनी सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व  राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

हे ही वाचा : पुण्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार तासशेवर

या संदर्भात शेलार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये शेलार म्हणाले की “मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?,” असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

"कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी"...खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!'' असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

हे ही वाचा :  कोरोना लशीमुळे देशात आतापर्यंत एकाचा मृत्यू; केंद्र सरकारची कबुली

''मुंबई मेट्रोचे काम ठप्प होणार? गेले चार महिने जपान सरकार निधीचा चौथा टप्पा देण्यास तयार असतानाही ठाकरे सरकारने फंड नाकारला. वाढलेला 10 हजार कोटींचा खर्च आणि कारशेडचे न्यायप्रविष्टतेचे फसवे कारण देऊन निधी नाकारला. श्रेयाचे नारळ फोडायला मात्र पुढे आणि विकासात सदैव आडवे घोडे!'' असेही शेलार म्हणाले आहेत. 

 
Edited By - Amol Jaybhaye  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख