भाजपच्या नेत्याला काँग्रेसच्या नेत्याकडून नागपंचमीनिमित्त असाही 'दंश'

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते अरूण यादव यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या टि्वटरवरून नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
Jyotiraditya Shinde.jpg
Jyotiraditya Shinde.jpg

नवी दिल्ली :  माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते अरूण यादव यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या टि्वटरवरून नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहे. अरूण यादव यांनी शिंदे यांच्या छायाचित्रासह त्यांना शुभेच्छा टि्वटरवरून पोस्ट केल्या आहेत. या टि्वटच्या शुभेच्छावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

ज्योतिरादित्य यांनी मार्च महिन्यात काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियातून वार केले आहेत. काही नेत्यांनी ज्योतिरादित्य यांना ''धोकेबाज' असे म्हणून टिका केली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर अरूण यादव यांनी पुन्हा एकदा ज्योतिरादित्य यांच्यावर निशाना साधला आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांनी नुकतीच राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. या शपथविधीच्या वेळी हे दोन्ही नेते एकमेंकासमोर आले होते. याबाबतचे छायाचित्र नुकतेच सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते.  दोन्ही नेते एकमेंकाना नमस्कार करीत असलेले हे छायाचित्र चर्चचा विषय ठरला होता.  
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा  : पावसाळी अधिवेशनात 11 अध्यादेश विधेयकांची रांग... 


नवी दिल्ली :  संसदेचे अधिवेशन सप्टेंबरमध्ये किंवा कधी भरवायचे याबाबत सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाचा निर्णय गुलदस्त्यात आहे. मात्र, अधिवेशन पूर्ण कालावधीसाठी भरविण्याबाबत सत्तारूढ भाजप ठाम आहे. कोरोनामुळे हे अधिवेशन पुढे ढकलले आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात लॉकडाउनच्या काळात व त्यापूर्वीही काढलेल्या अध्यादेशांची किमान तब्बल 11 विधेयके संसदीय तत्काळ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोणत्याही अध्यादेशाला सहा महिन्यांच्या आत संसदेची मंजुरी मिळविणे अत्यावश्‍यक असते. त्यादृष्टीने विविध मंत्रालयांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात मंत्री व खासदारांचे वेतन व भत्तेरद्द करणे, जीवनावश्‍यक वस्तू कायद्यात बदल, डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांना कोठडी आदी अध्यादेशांचा समावेश आहे. यातील बहुतांश अध्यादेशांची मुदत याआधीच संपून गेली आहे. मात्र कोवीड-19 मुळे संसदीय अधिवेशन लांबवणे भाग पडले हे सबळ कारण सरकारकडे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com