अर्णव गोस्वामींच्या फोटोला मारले जोडे... - Arnav Goswami protest by Pimpri Chinchwad City District Youth Congress  | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णव गोस्वामींच्या फोटोला मारले जोडे...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

अर्णव गोस्वामी मुर्दाबाद, भाजपा का दलाल मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. 

पिंपरी : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे  रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी यांच्या प्रतिमेला पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसने जोडे मारून त्यांचा काल धिक्कार केला. केंद्रातील भाजप सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला.

शहरातील मुख्य डॉ. बाबासाहेब आंबे़डकर चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अर्णव गोस्वामी मुर्दाबाद, भाजपा का दलाल मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “टीआरपी घोटाळ्यामध्ये भाजप आणि मोदी सरकारचा हात असल्याचे गोस्वामीच्या उघ़ड झालेल्या व्हाटसअप चॅटमधून स्पष्ट होत आहे. त्याबाबत त्यांनी तात्काळ खुलासा करण्याची गरज आहे. अर्णव याने, तर आपण भाजपचे गुलाम व दलालच असल्याचे दर्शवून दिले आहे.

देशाची गोपनीय माहिती त्याला मिळतेच कशी ? या प्रकरणातून पुन्हा एकदा भाजपचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय जैन, शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, शहर सरचिटणीस शंकर ढोरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, गौरव आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉटस्‌ ऑप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे.

यावरून आता गोस्वामींसह भाजप सरकार अडचणीत आले असून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टि्वटच्या माध्यमातून केंद्र सरकारला या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख