राष्ट्रवादीला डिवचण्याचा काँग्रेसचा प्लॅन : ओबीसी आरक्षणाचा लढा बारामतीतून... - Announcement of Vijay Vadettiwar at OBC meet in Baramati on 29th July  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राष्ट्रवादीला डिवचण्याचा काँग्रेसचा प्लॅन : ओबीसी आरक्षणाचा लढा बारामतीतून...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

आम्ही जागृत राहिलो, तरच आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मला राजकीय भाषण करायचे नाही.

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी  (OBC Reservation) लढा तीव्र करणार असल्याचे राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. लोकांना विषयांची विस्तृत माहिती देण्यासाठी ओबीसी समाजाच्या रोज जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये बैठका सुरु आहेत. ओबीसी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्यासाठी २२ जुलैपासून मेळावे घेणार आहे. त्या अंतर्गत 29 जुलैला बारामतीमध्ये ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी यावेळी केली. (Announcement of Vijay Vadettiwar at OBC meet in Baramati on 29th July) 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीकडे लक्ष द्यावे, लागेल असे म्हटले होते. त्यातच आता वडेट्टीवार यांनी मेळाव्याची घोषणा केल्यामुळे बारामती पुन्हा चर्चेत आली आहे.

हेही वाचा : बीएचआर घोटाळा; २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन

ओबीसी आरक्षण टिकावे, महामंडळांना निधी द्यावा आणि घरकुल मिळावे, यासाठी आगामी दोन महिन्यांमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत. त्यासाठी २२ जुलै पासून राज्यभर मेळावे घेणार आहे. ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून ६ ऑगस्टला बीडमध्ये मोर्चा काढणार आहे. ओबीसींनी एका झेड्यांखाली यावे आणि आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी हे मेळावे होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी समाजामध्ये जनजागृती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आरक्षण संपवण्याचा घाट काही लोकांचा आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.  

भटक्या जमातींना कुठेही न्याय मिळालेला नाही. मी जरी मंत्री असलो तरी सगळेच प्रश्न सुटू शकत नाहीत. कारण तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे काही मर्यादा आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येणार आहे. एकत्र येवून सगळे प्रश्न प्रभावीपणे मांडले तर मार्ग निघेल. येथे सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही आमंत्रित केले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मेळाव्यात त्या जिल्ह्यातील नेत्यांना बोलवणार आहे. सर्व ओबीसी बांधवांनी मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची प्रतिक्षा 

आम्ही जागृत राहिलो, तरच आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मला राजकीय भाषण करायचे नाही. ओबीसी समाज जागृत झाला तर त्यांचे आरक्षण कोणीच संपवू शकणार नाही. कोणत्याही पक्षाला ओबीसीशिवाय पर्याय नाही. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे काही प्रश्नांवर एकमत होते, काही प्रश्नांवर एकमत होत नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी आरक्षणासंदर्भात भेट घेतली. त्या विषयी वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यांनाच आरक्षणचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख